पुणे - खासगी १९ बसचालकांना दंड
पुणे, 23 ऑक्टोबर, (हिं.स.)। दिवाळीमध्ये खासगी बसचालक जादा तिकिट दर घेतल्याच्या तक्रारी वारंवार येत असतात. त्या पार्श्वभूमीवर पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने म्हणजे आरटीओने वेगवेगळ्या भागात ४२ खासगी बसची तपासणी केली. त्यापैकी १९ बस चालकांनी नियमां
पुणे - खासगी १९ बसचालकांना दंड


पुणे, 23 ऑक्टोबर, (हिं.स.)। दिवाळीमध्ये खासगी बसचालक जादा तिकिट दर घेतल्याच्या तक्रारी वारंवार येत असतात. त्या पार्श्वभूमीवर पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने म्हणजे आरटीओने वेगवेगळ्या भागात ४२ खासगी बसची तपासणी केली. त्यापैकी १९ बस चालकांनी नियमांचे उल्लघन केल्यामुळे दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे खासगी बसचालकांवर वचक बसला.मागील तीन ते चार दिवसात काही चालकांकडून तिकिट दरवाढीबरोबरच अन्य तक्रारी आरटीओकडे आल्या आहेत. त्याची शहानिशा करून पुढील कारवाई होईल असे पुणे आरटीओकडून सांगण्यात आले.

दिवाळीमध्ये बाहेरगावी जाणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या बसचालकांवर वचक बसावा, जादा तिकिटदर आकारू नये यासाठी आरटीओ कार्यालयात सर्व बस मालकांची बैठक बोलावून सूचना दिल्या. तसेच पहिल्याच दिवशी आरटीओच्या पथकाने बसची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बसवर कारवाईही केली. त्यानंतर काही बसचालकांनी नियमाप्रमाणे वाहतूक केली.मात्र, काही बसचालकांनी जादा तिकिटदर घेतल्याच्या तक्रारी आरटीओकडे आल्या आहेत. दिवाळीत परतीच्या प्रवासालाही खासगी बसचालकाकडून जादा तिकिटदर आकरले जातात. त्यामुळे खासगी बस चालकांनी नियमापेक्षा जादा तिकीट दर आकारू नये. सर्व नियमांचे पालन करावे, अशा सूचना आरटीओने दिल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande