सोलापूर, 23 ऑक्टोबर (हिं.स.)।
राज्यात मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यात गेल्या महिन्यात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्य सरकारने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ३२५८ कोटींची मदत दिवाळीपूर्वी वाटप करण्यास मंजुरी दिली असून त्याचा निपटारा करण्यासाठी महसूल विभागाचे कर्मचारी सुटीच्या दिवशीही कामावर हजर आहेत. मात्र सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या या मदतीतून कर्जवसुली करण्यासाठी बँका सरसावल्या असताना त्यास प्रशासनाने विरोध केला. तसे केल्यास सबंधित बँकांवर फौजदारी कारवाई केली जाईल अशी इशारा देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये सीना नदीकाठ व अक्कलकोट तालुक्याला अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे. अशा पूरग्रस्तांच्या थेट बँक खात्यात नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू सध्या झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड