अमरावती, 23 ऑक्टोबर (हिं.स.)
समृद्धी महामार्गावर टोमॅटो घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक भीषण आग लागल्याची घटना चैनल नंबर 106 जवळ घडली. या आगीत ट्रकचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने चालक व वाहक यांनी वेळेत उडी मारून जीव वाचवला. दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत.
आग लागल्याने ट्रक उलटला व त्यातील टमाटर रस्त्यावर पसरले. घटनेची माहिती मिळताच धामणगाव नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाचे फायरमन हेमंत कापसे व प्रशांत रोकडे, तसेच चालक सतीश उईके यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. त्यांच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी