
परभणी, 27 ऑक्टोबर (हिं.स.): जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र. २, परभणी येथे प्रलंबित मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ ठेकेदारांनी आज, दिनांक २७ ऑक्टोबर पासून कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला आहे.
उपोषणकर्त्यांनी १५ ऑक्टोबर रोजी लेखी निवेदन देऊन कामे मंजूर करून देण्याची तसेच थकबाकी व इतर प्रशासकीय तक्रारींचे निराकरण करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने संतप्त ठेकेदारांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला.
एकनाथ वाव्हळे, विनायक साळवे, राजेश गायकवाड, परमेश्वर कांबळे, नागेश गायकवाड, सिद्धार्थ कसारे, बापूराव खारे, बबनराव देशमुख, मनोज पाटील, विजय ठाकूर, एजाज खान, राहुल ठाकूर, प्रभांति ईनामदार, प्रविण टेकाळे, नामदेव लोखंडे, बापू वाघमारे, परसराम वाघमारे, दिलीप ढवळे, यादव अंभोरे, सुरेश काळे, चांदू बोराडे आदी ठेकेदार या उपोषणात सहभागी झाले आहेत.
“दोन ते तीन वर्षांपासून कामांसाठी सतत पाठपुरावा करूनही कोणतीही दखल घेतली जात नाही,” असा आरोप ठेकेदारांनी केला. उपोषणादरम्यान काही अनिष्ट घटना घडल्यास जायकवाडी पाटबंधारे विभाग प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis