
छत्रपती संभाजीनगर, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर शहरातून दिल्लीसाठी एअर इंडियाचे एक आणि इंडिगोचे एक, अशी दिवसभरात २ विमाने होती.नव्या वेळापत्रकानुसार शहरातून एअर इंडियाकडून दिल्लीसाठी दुपारच्या वेळेत विमानसेवा सुरू करण्यात आली.त्यामुळे शहरातून आता दिल्लीसाठी सकाळी, दुपारी अन् सायंकाळी अशी ३ विमाने उड्डाण घेणार आहेत.
विमान कंपन्यांचे २८ मार्च २०२६ पर्यंतच्या काळात लागू होणारे हिवाळी सत्रातील वेळापत्रक झाले. यात एअर इंडियाकडून दुपारच्या सत्रात दिल्लीसाठी एक जादा विमान सुरू करण्यात आले. आगामी काळात विमानतळावरून आणखी काही शहरांसाठी विमानसेवा सुरू होण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाकडून प्रयत्न सुरू आहेत.
विमानातून तब्बल १५६ विमान प्रवाशांनी शहरातून दिल्लीचा प्रवास केला.दुपारच्या सत्रात हे विमान सुरू झाल्यामुळे, छत्रपती संभाजीनगर येथून दिल्लीसाठी जाणा-या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दिल्ली विमानाचे वेळापत्रक– एअर इंडिया : सकाळी ६ वा. दिल्लीहून उड्डाण, सकाळी ८ वा. शहरात दाखल. शहरातून सकाळी ८:४० वा. उड्डाण व १०:३५ वा. दिल्लीत.– एअर इंडिया : दुपारी २ वा. दिल्लीहून उड्डाण, दुपारी ३:५० वा. शहरात दाखल. शहरातून सायं. ४:३० वा. उड्डाण व सायं. ६:२० वा. दिल्लीत.– इंडिगो : सायं. ४:५५ वा. दिल्लीहून उड्डाण, सायं. ६:४५ वा. शहरात दाखल. शहरातून सायं. ७:१५ वा. उड्डाण व रात्री ९:०५ वा. दिल्लीत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis