
अकोला, 27 ऑक्टोबर (हिं.स.): आदिवासींच्या आरक्षण वर्गात इतर समाजघटकांकडून होत असलेल्या घुसखोरीच्या तीव्र निषेधार्थ सकल आदिवासी एकता महासंघ तसेच सर्व आदिवासी संघटनांच्या वतीने आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर बोगस घुसखोरी हटाव जनआक्रोश मोर्चा, काढण्यात आला आहे.
अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदान येथून हा मोर्चा धिंग्रा चौक, गांधी रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आलं.. निवेदनात आदिवासी आरक्षण प्रवर्गात इतर समाजातील लोकांची घुसखोरी तत्काळ थांबविण्याची मागणी प्रमुख्याने करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी सल्लागार समितीची तातडीने बैठक घेण्यात यावी, आदिवासी जमाती कायद्यात आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात, अशा मागण्यांचाही समावेश आहे.
आदिवासी प्रवर्गात धनगर, बंजारा, वडार, गोपाल यांसारख्या भटक्या जातींची घुसखोरी थांबवावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील आदिवासी सल्लागार परिषदेची बैठक नियमित घेण्याची मागणीही करण्यात आली. जात पडताळणी कायद्यात सुधारणा, ८५ हजार रिक्त पदांची भरती, आणि छत्रपती संभाजीनगर येथील बोगस वैधता प्रकरणांवर एसआयटी चौकशीची मागणी समाजाने केली. दरम्यान यावेळी आपल्या पारंपरिक वेशभूषा परिधान करत एक तरी एक कमाल क्रिकेट क्लब मैदान येथून अकोल्याच्या जिल्हाधिकारी भव्य जन आक्रोश मोर्चा काढून बिंदू नियमावलीतील बदलामुळे झालेल्या अन्यायाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव महिला पुरुष समवेत या मोर्चात सहभागी झाल्या होत्या न्याय्य हक्कांसाठी लढा देण्यासाठी या मोर्चात आदिवासी समाजातील महिला, पुरुष, युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते....
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे