अकोला : बार्शीटाकळी शहरात मृतदेह आढळल्याने खळबळ
अकोला, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।बार्शिटाकळी शहरातील सुरज वाईन बार समोरील मोकळ्या जागेत आज सकाळी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. सकाळी सुमारे ६ वाजता बार्शिटाकळी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.प
अकोला : बार्शीटाकळी शहरात मृतदेह आढळल्याने खळबळ


अकोला, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।बार्शिटाकळी शहरातील सुरज वाईन बार समोरील मोकळ्या जागेत आज सकाळी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. सकाळी सुमारे ६ वाजता बार्शिटाकळी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.प्राथमिक तपासात मृत इसमाचे नाव अफसर खॉ रशीद खॉ (वय ३३ वर्षे, रा. बार्शिटाकळी) असे असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.

सीसीटीव्ही फुटेजमधून अपघाताचा उलगडा!

सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर उघड झाले की, दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १०.१५ वाजता, अफसर खॉ हे सुरज वाईन बारमधून दारूच्या नशेत बाहेर पडले होते. त्याचवेळी बारचे मालक संतोष शंकरराव काळदाते हे त्यांच्या चारचाकी वाहनासह घरी जाण्यासाठी निघाले होते.

दारूच्या अंमलाखाली असलेले अफसर खॉ हे चालताना अचानक गाडीच्या डाव्या बाजूला कोसळले. त्याच क्षणी गाडी वळविताना चालकाला मृतक दिसला नाही आणि वाहन त्यांच्या अंगावरून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसते. त्यामुळे अफसर खॉ यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

सदर घटना समजताच फॉरेन्सिक व्हॅनला घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून, पोलिसांनी वाईन बारचे मालक संतोष काळदाते तसेच अपघातातील चारचाकी वाहन ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, बारमध्ये काम करणाऱ्या दिपक बाळकृष्ण डोंगरे यांनी अपघाताची माहिती पोलिसांना न कळविल्याने त्याच्यावरही कारवाई सुरू आहे.या प्रकरणी बार्शिटाकळी पोलीस स्टेशनमध्ये कलम १०६, २८१, २३९ भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास बार्शिटाकळी पोलीस करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande