
अमरावती, 27 ऑक्टोबर (हिं.स.) - दारुच्या अतिसेवनामुळे मेळघाटात होणारे मृत्यूसह विविध आजारांचे परीणाम सर्व विहित झाल्याने एकेका गावात आता दारुबंदी मोहिम सुरु झालेली आहे. ग्रामसभेने ठराव घेतल्यानंतर बंदीच्या आग्रहासाठी आदिवासी आता थेट जिल्हाधिकारी कार्यालय अमरावतीत पोहोचले आहेत.
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना धारणी तालुक्यातील खाऱ्या गावातील नागरिकांनी एक निवेदन सादर करून गावातील दारु बंद करण्याची मागणी केली आहे. या विषयी धारणी पोलिसांना पण, ठराव व निवेदन दिले आहे.
दारु पिल्याने अनेक तरुणांचे जीवन उध्वस्त होत आहे. खाऱ्या गावात एक सभा घेवून स्थानिक पदाधिकारी, महिला व तरुणांनी दारुबंदीचा ठराव केलेला होता. या शिवाय विकणारे व विकणाऱ्यास मदत करणारे व दारु पिवून गावात येणारे अशांवर आर्थिक दंड लावण्याचा निर्णय सुद्धा ग्रामसभेत घेण्यात आला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी