
अमरावती, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।
विधानसभेतील मतदारयाद्यांच्या विभाजनाची प्रक्रिया महापालिकेच्या प्रभागनिहाय मतदारयाद्यांची माहिती निवडणूक आयोगाला सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर असून महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी मतदारयाद्यांच्या विभाजनाची प्रक्रिया राबविण्यासाठी विविध पथकांचे गठण केले आहे.
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभागरचनेचा टप्पा पूर्ण झाल्यावर प्रारूप मतदारीयादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. १ जुलै २०२५ पर्यंतची मतदार नोंदणी गृहीत धरण्यात येणार आहे; मात्र २०२४ मधील त्यासाठी आधी विधानसभा निवडणूक मतदारयाद्यांचे महापालिकेतील प्रभागनिहाय विभाजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे या मतदारयाद्यांच्या विभाजनासाठी प्रभागनिहाय अधिकाऱ्यांचे पथक गठीत करण्यात आले आहे.
या पथकातील अधिकारी व कर्मचारी संबंधित प्रभागांमध्ये जाऊन स्थळनिरीक्षण करणार आहेत. त्यानंतर त्या माहितीचा प्रभागनिहाय कंट्रोल चार्ट निवडणूक आयोगाकडे ३१ ऑक्टोबरपर्यंत सादर करावा लागणार आहे. दरम्यान, या पथकांचे नियंत्रण अधिकारी म्हणून संबंधित साहाय्यक आयुक्त, पथकप्रमुख म्हणून उपअभियंता यांची नियुक्ती करण्यात आली असून, पथकात झोनमधील साहाय्यक अभियंता, स्वास्थ निरीक्षक, वसुली लिपिकांचाही समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी