
धाराशिव, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या तुळजापूर येथील कार्यकर्त्यांची दोन दिवसातच भाजपमध्ये घरवापसी झाली आहे.
तुळजापूर शहरातील दयावान नगर येथील भाजपच्या काही युवक कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला होता. दोनच दिवसांत त्यांना वेगळे अनुभव आल्याने तसेच तुळजापूरचा विकास भाजपाच करू शकते अशी भावना झाल्याने आमदार राणाजगजीतसिंह पाटील, विनोद (पिटूभैय्या) गंगणे, भाजपा शहराध्यक्ष आनंद कंदले त्यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास ठेवत या युवकांनी स्वगृही भाजप मध्ये घर वापसी केली आहे.
भाजप आमदार पाटील यांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार,भाजपात गृहवापसी करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने ऋतिक निंबाळकर, अजय धनके, श्रीनाथ काशीद, गणेश कोथिंबीरे, अक्षय जगताप, सुरज कानडे, पप्पू जाधव यांचा समावेश आहे. या सर्वांचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पक्षात स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी विनोद (पिटूभैय्या) गंगणे, भाजपा शहराध्यक्ष आनंद कंदले, विजय कंदले, अण्णाप्पा पवार, पाराजी देवकर, श्रावण पवार सर, सतीश बांडे, मिथुन पोफळे, अण्णा देवकर, दादा साळुंके, दाजी देवकर, राजु पवार, तुकाराम देवकर, पिकू नरसुडे, सुलेमान शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis