चंद्रपूरात 13 वर्षांखालील मुलामुलींकरीता होणार फुटबॉल निवड चाचणी
चंद्रपूर, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। चंद्रपूर जिल्ह्यातील 13 वर्षाखालील फुटबॉल खेळाडूंचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा फुटबॉल संघटन
चंद्रपूरात 13 वर्षांखालील मुलामुलींकरीता होणार फुटबॉल निवड चाचणी


चंद्रपूर, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।

चंद्रपूर जिल्ह्यातील 13 वर्षाखालील फुटबॉल खेळाडूंचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा फुटबॉल संघटना, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने उदयोन्मुख खेळाडूंना फुटबॉलमध्ये वाव मिळावा, यासाठी ‘महादेवा योजनेअंतर्गत’ मुला व मुलींच्या निवड चाचणीचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, सिव्हील लाईन चंद्रपूर येथे 30 ते 31 ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे.

महादेवा फुटबॉल निवड चाचणी करिता चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता राज्य क्रीडा मार्गदर्शक विजय डोबाळे (9545858975) यांच्याशी संपर्क करावा, असे कळविण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande