चिमूर वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात माजी सरपंचाचा मृत्यू
चंद्रपूर, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। चिमूर वनपरिक्षेत्रातील शिवरा येथील शेतशिवारात शेतकऱ्यावर हल्ला करून वाघाने ठार केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. शेतकऱ्याचा मृतदेह रात्री ११ वाजता खालेल्या अवस्थेत सापडला.ते गावचे माजी सरपंच होते. चिमूर वनपरिक्षेत
संग्रहित छायाचित्र


चंद्रपूर, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। चिमूर वनपरिक्षेत्रातील शिवरा येथील शेतशिवारात शेतकऱ्यावर हल्ला करून वाघाने ठार केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. शेतकऱ्याचा मृतदेह रात्री ११ वाजता खालेल्या अवस्थेत सापडला.ते गावचे माजी सरपंच होते.

चिमूर वनपरिक्षेत्रातील डोमा नियतक्षेत्रात नीलकंठ भुरे (६०) हे शेतकरी रविवारी सायंकाळी शेतावर पीक पाहणीसाठी गेले होता. उशीर झाल्याने घरच्यांसह गावकऱ्यांनी शोधाशोध केली. याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने दाखल झाले. शोध मोहीम राबविली असता त्या ठिकाणी त्यांची सायकल असल्यामुळे त्यांना शंका आली. तेव्हा नाला परिसरात रात्री माजी सरपंचांचा मृतदेह खाल्लेल्या अवस्थेत सापडला. सदर घटनेनंतर परिसरात गस्त वाढविण्यात आली असून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande