
छत्रपती संभाजीनगर, 27 ऑक्टोबर (हिं.स.)छत्रपती संभाजी राजे साखर उद्योग लि. कारखान्याचा २५ वा ऊस गळीत हंगाम शुभारंभ राजस्थान चे महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना यांच्या हस्ते संपन्न झाला.या प्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक अध्यक्ष हरीभाऊ बागडे नाना यांनी उपस्थितांना कारखान्याची प्रगती, नवीन योजना आणि विकासात्मक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. शेतकऱ्यांच्या हितासाठी या साखर कारखान्याची निर्मिती करण्यात आली या कारखान्याने अत्यंत प्रगती केल्याचा उल्लेख त्यांनी केला.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात या साखर कारखान्याने नवनवीन योजना शेतकऱ्यांसाठी राबवल्या यामुळे उत्पादन देखील वाढले असल्याचे ते म्हणालेयावेळी उद्योजक श्री.राम भोगले, उद्योजक श्री.विवेक देशपांडे, आमदार सौ.अनुराधा ताई चव्हाण, व्हाईस चेअरमन, सर्वश्री संचालक मंडळ तसेच पंचकृषीतील ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis