
छत्रपती संभाजीनगर, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।शिवसेना खासदार संदिपान भुमरे मंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कार्यालय, मराठवाडा पदवीधर नोंदणीपूर्व बैठक संपन्न झाली.
छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती कार्यालयात मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीपूर्व तयारी संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत पदवीधर नोंदणी मोहिमेची रूपरेषा, कार्यकर्त्यांची जबाबदारी आणि जनजागृती याविषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुढील नोंदणी मोहिमेसाठी जास्तीत जास्त नोंदणी करण्याचा निर्धार व्यक्त केला. युवक हा आपल्या देशाचा महत्वाचा घटक आहे त्यामुळे या पदवीधर नोंदणीसाठी जास्तीत जास्त युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट , आमदार प्रदीप जैस्वाल, माजी आमदार कैलास पाटील, माजी महापौर नंदकुमार घोडीले विकास जैन्न, जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ, संजय तायडे, शहरप्रमुख विश्वनाथ राजपुत, महिला आघाडीच्या शिल्पाराणी वाडकर, युवासेना जिल्हाप्रमुख शेखर जाधव यांच्यासह शिवसेना पदाधिकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis