
रत्नागिरी, 27 ऑक्टोबर, (हिं. स.) : राजापूरजवळच्या शीळ गावच्या माजी सरपंच सुप्रिया पेडणेकर यांची कन्या प्रेरणा संजय पेडणेकर यांनी शहरातील मुख्य मार्गावर भगवती एंटरप्रायझेस हे नागरी सुविधा केंद्र सुरू केले आहे. त्याचा प्रारंभ राजापूरचे माजी नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांच्या हस्ते झाला.
जकातनाका ते जवाहर चौक या मुख्य मार्गावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासमोर हे सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या प्रारंभप्रसंगी प्रकाश चव्हाण, सुप्रिया पेडणेकर, सरपंच अशोक दिलीप मठकर, सेवानिवृत्त शिक्षक विनय गुरव, ॲड. मिलिंद चव्हाण, भाजपाचे अनिलकुमार करंगुटकर आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
भगवती एंटरप्रायझेसच्या माध्यमातून खरेदी खत, गहाणखत, साठे खत, मुख्यत्यारपत्र, सर्च रिपोर्ट, वारस तपास, हक्कसोडपत्र, बक्षीस पत्र, मराठी, इंग्रजी टायपिंग, झेरॉक्स, विविध दाखले, ऑनलाइन सातबारा, आठ अ अशी विविध कामे करून दिली जाणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी