बच्चू कडूंचा ‘महा एल्गार’ मोर्चा नागपूरकडे रवाना
अमरावती, 27 ऑक्टोबर (हिं.स.)शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी नेते बच्चू कडू यांनी आपल्या मूळगाव बेलोरा (ता. चांदूर बाजार) येथून ट्रॅक्टर महा एल्गार मोर्चाला सुरुवात केली. मोठे शक्तीप्रदर्शन करत हा मोर्चा आज नागपूरच्या दिशेने रवान
बच्चू कडूंनी मानले काँग्रेसचे आभार .... शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या बच्चू कडू यांच्या आंदोलनाला आता काँग्रेसचा पाठिंबा मिळाला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केल्याबद्दल बच्चू कडू यांनी फोनवरून त्यांचे आभार मानले. “काँग्रेस पक्षाचे मनःपूर्वक आभार; त्यांच्या पाठिंब्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला आहे. आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही, आम्ही शेतकरी आहोत आणि ही भावना संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली पाहिजे,” असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढे काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन केले की, “मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि शेतकऱ्यांच्या लढाईला बळ द्या.”कडू म्हणाले, “राष्ट्र निर्माण करायचं असेल, तर आधी शेतकरी निर्माण झाला पाहिजे. अजित नवले, राजू शेट्टी, महादेव जानकर, रविकांत तुपकर, विजय जाऊंद्या यांचं योगदान मी मान्य करतो. ही फक्त आंदोलन नाही, तर शेतकऱ्यांसाठीची अखेरची आणि निकरीची लढाई आहे.”


अमरावती, 27 ऑक्टोबर (हिं.स.)शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी नेते बच्चू कडू यांनी आपल्या मूळगाव बेलोरा (ता. चांदूर बाजार) येथून ट्रॅक्टर महा एल्गार मोर्चाला सुरुवात केली. मोठे शक्तीप्रदर्शन करत हा मोर्चा आज नागपूरच्या दिशेने रवाना झाला असून उद्या दुपारी नागपूरमध्ये धडकणार आहे.

अमरावती जिल्ह्यातील शेतकरी, तरुण, महिलांसह मोठ्या संख्येने नागरिक या मोर्चात सहभागी झाले आहेत. ठिकठिकाणी मोर्चाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत असून ढोल-ताशांच्या निनादात व डीजेच्या गजरात ही रॅली पुढे सरकत आहे. मेंढपाळ बांधवही आपल्या मेंढ्यांसह या आंदोलनात सहभागी झाले आहेत.आज रात्री वर्धा जिल्ह्यातील सुकळी येथे मुक्काम असणार आहे. आंदोलनादरम्यान बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली. “कर्जमाफीशिवाय गावात परतणार नाही. गरज भासल्यास गोळ्याही झेलायला तयार”असे तीव्र वक्तव्य त्यांनी केले.शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या बच्चू कडू यांच्या आंदोलनाला आता काँग्रेसचा पाठिंबा मिळाला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केल्याबद्दल बच्चू कडू यांनी फोनवरून त्यांचे आभार मानले.“काँग्रेस पक्षाचे मनःपूर्वक आभार; त्यांच्या पाठिंब्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला आहे. आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही, आम्ही शेतकरी आहोत आणि ही भावना संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली पाहिजे,” असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

त्यांनी पुढे काँग्रेस कार्यकर्त्यांना आवाहन केले की, “मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा आणि शेतकऱ्यांच्या लढाईला बळ द्या.”कडू म्हणाले, “राष्ट्र निर्माण करायचं असेल, तर आधी शेतकरी निर्माण झाला पाहिजे. अजित नवले, राजू शेट्टी, महादेव जानकर, रविकांत तुपकर, विजय जाऊंद्या यांचं योगदान मी मान्य करतो. ही फक्त आंदोलन नाही, तर शेतकऱ्यांसाठीची अखेरची आणि निकरीची लढाई आहे.”

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande