मदतीसाठी आपत्तिग्रस्तांचा तहसीलदारांना परभणीत घेराव
परभणी, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील भीमनगर, क्रांतीनगर, साकळा प्लॉट, माऊलीनगर, काकडे नगर, रोशनी नगर या भागातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना शासनाकडून अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाही. पंचनामे पूर्ण होऊनही सहाय्य मिळत नस
मदतीसाठी आपत्तिग्रस्तांचा तहसीलदारांना परभणीत घेराव


परभणी, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 16 मधील भीमनगर, क्रांतीनगर, साकळा प्लॉट, माऊलीनगर, काकडे नगर, रोशनी नगर या भागातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना शासनाकडून अद्याप आर्थिक मदत मिळालेली नाही. पंचनामे पूर्ण होऊनही सहाय्य मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदारांचा घेराव घातला.

या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना विभागप्रमुख अशोक गव्हाणे पाटील, प्रल्हाद चव्हाण व अविनाश अवचार यांनी केले. त्यांनी तहसीलदारांना निवेदन देत तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली. तहसीलदारांनी लवकरच सर्व आपत्तिग्रस्तांना शासनाकडून आर्थिक साह्य वितरित करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या वेळी प्रभू शिराळे, सय्यद फारुक, कार्तिक जाधव, विष्णू दादा, रवी कांबळे, बाळू घोगरे, लखन पवार, गोपालसिंग टाक, गडेबाई, देवकी राष्कुट, मुमताज शेख, समीना बी. यांच्यासह अनेक महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी आपल्या समस्या मांडताना शासनाकडून तातडीने मदत न मिळाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande