दिवाळीनंतरचा परतीचा प्रवास व छठ उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी 15 विशेष रेल्वे गाड्या
जळगाव , 27 ऑक्टोबर (हिं.स.) दिवाळीनंतरचा परतीचा प्रवास व छठ उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर जळगाव आणि भुसावळ मार्गे मध्य रेल्वेने विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उत
दिवाळीनंतरचा परतीचा प्रवास व छठ उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी 15 विशेष रेल्वे गाड्या


जळगाव , 27 ऑक्टोबर (हिं.स.) दिवाळीनंतरचा परतीचा प्रवास व छठ उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर जळगाव आणि भुसावळ मार्गे मध्य रेल्वेने विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर भारत, विदर्भ, तसेच महाराष्ट्रातील विविध दिशांकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही मोठी सोय ठरणार आहे.

२८ ऑक्टोबरला एकूण २३ विशेष गाड्या धावणार आहेत. त्यापैकी १५ गाड्या भुसावळ विभागातून धावणार आहे.मुंबई येथून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर (क्र ०१०११) ही गाडी नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ येथे थांबेल. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-दानापूर अनारक्षित विशेष गाडी (क्र. ०१०१३) नाशिक रोडनंतर भुसावळ, खंडवा या स्थानकांवर थांबणार आहे.सीएसएमटी-गोरखपूर विशेष (क्र. ०१०७९) ही गाडी नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ या स्थानकांवर थांबेल. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस-दानापूर (गाडी क्र. ०११४३) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस-मुजफ्फरपूर (गाडी क्र. ०१०४३) या गाड्यांनाही भुसावळला थांबा असेल. लोकमान्य टिळक टर्मिनस-वाराणसी विशेष ( क्र. ०४२२५) ही गाडीदेखील भुसावळमार्गे जाईल.पुणे विभागातून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये पुणे-गाझीपूर सिटी (क्र. ०१४३१), पुणे-गोरखपूर (क्र. ०१४१५), पुणे-दानापूर (गाडी क्र. ०१४४९), पुणे-अमरावती (क्र. ०१४०३), पुणे-नागपूर (गाडी क्र. ०१४०१) आणि हडपसर-नागपूर (गाडी क्र. ०१२०२) या सर्व गाड्यांना जळगाव व भुसावळ येथे थांबा देण्यात आला आहे. नागपूर-पुणे (क्र. ०१४१०) आणि नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (क्र. ०१०१२) या दोन्ही गाड्यांनाही भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव येथे थांबे असतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande