
येवला, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।
- शेतकऱ्यांसाठी खताच्या किमती कमी कराव्या यासह विविध मागण्यांसाठी करता येथील कृषी उत्पन्न बाजार समिती बाहेर शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले यामुळे येवला इंदोर महामार्ग ठप्प झाला होता.
मागील काही दिवसापासून सातत्याने शेतकरी अडचणीत आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये शासन काही पावलं उचलत नाही, म्हणून संतप्त भावना निर्माण झालेले आहेत या भावनांमुळे आज सोमवारी दिवाळीनंतर कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू झाल्या. त्यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी छावा क्रांतिवीर सेनेच्या गोरख संत, प्रफुल्ल गायकवाड या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली खताच्या किमंतीमध्ये अचानक २०० रुपयाची वाढ झाली आहे.शेतकऱ्यांच्या कुठल्याही पिकाला योग्य भाव नसतांना कंपन्यानी केलेली भाव वाढ तत्काळ घेतलेला निर्णय मागे घेऊन शेतकऱ्यांना खताच्या गोण्यामध्ये भाव कमी करून न्याय द्यावा, राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करतो असे आश्वासन दिले होते तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ पैसे जमा करावेत यासह विविध मागण्यांसाठी येवला इंदूर महामार्गावरती बाजार समितीच्या बाहेर रस्ता रोको आंदोलन केलं. सुमारे अर्धा पाऊण तास चाललेल्या या रस्ता रोको आंदोलनानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यादरम्यान या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV