
इगतपुरी, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।
- नाशिक ते डहाणू रेल्वे मार्गाचे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्व्हेक्षण सुरू आहे. या सव्र्व्हेक्षणाला शेतकऱ्यांनी विरोध केलेला असून, नाशिक-त्रंबकेश्वर रस्ता कुंभमेळ्याच्या धर्तीवर रुंदीकरण करण्यासाठी शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. तसाच नाशिक ते डहाणू रेल्वे मार्गालाही शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे रेल्वे आणि रस्ता रुंदीकरणाविरोधात शेतकऱ्यांनी लोकलढा उभारला आहे.
नाशिक ते डहाणू हा रेल्वे मार्ग नाशिक आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये विस्तारणार आहे. प्राथमिक स्वरूपात आकाशातून ड्रोन कॅमेऱ्याने सर्व्हेक्षण केले जात आहे. यामध्ये फॉरेस्टची जागा, पडीत जमीन, बागायती-जिरायती जमीन, पाणी, डोंगर, धार्मिक वास्तू यांचा सर्वे करून रेल्वे मार्ग कोणत्या दिशेने न्यायचा हे ठरवले जाणार आहे. खंबाळे या गावांमध्ये सर्व्हेक्षण करताना शेतकऱ्यांनी सर्व्हेक्षण करणाऱ्या लोकांना विरोध केला. शेतकरी सध्या अल्पभूधारक होत असून, त्याला भूमिहीन करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नाशिक ते डहाणू हा १८० ते २२० किलोमीटरचा रेल्वे मार्ग असणार आहे यामध्ये नाशिकरोड, त्र्यंबकेश्वर, जव्हार, विक्रमगड, डहाणू, बोईसर ही स्टेशने भविष्यात कार्यान्वित करण्यात येणारे आहेत. यासाठी पालघर आणि नाशिकं जिल्ह्यातील काही तालुक्यातील गावे बाधित होणार आहेत. द्रोणाचार्य व आर्वी असोसिएट कंपनीने हा सर्वे करण्याचा ठेका घेतलेला आहे. यामध्ये किमान अडीच हजार गावे बाधित होणार असल्याचे बोलले जात आहे.
या या रेल्वे रेल्वे मार्गाला मार्गाला आमचा आमचा विरोध विरोध असून, अनर नाही. रेल्वे मार्ग माझ्या घरावरून जात आहे हे मला आज कळाले आणि मी अस्वस्थ झालो. ज्या ठिकाणाहून रेल्वे मार्ग जातो तेथील आसपासच्या एक किलोमीटर परीघातल्या जमिनी बाधित होत असतात. त्यामुळे या प्रकल्पाला आमचा विरोध आहे. आहे.
- संजय महाले, शेतकरी खंबाळे, इगतपुरी.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV