सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करा - आ. कराड
लातूर, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या हमी भावाप्रमाणे लातूर जिल्हयात सोयाबीन खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करावीत अशी मागणी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे लातूर ग्र
हमीभाव खरेदी केंद्र सुरु न झाल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय


लातूर, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या हमी भावाप्रमाणे लातूर जिल्हयात सोयाबीन खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करावीत अशी मागणी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे लातूर ग्रामीणचे भाजप आमदार रमेशआप्पा कराड यांनी एका पत्राद्वारे केली आहे.

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व महापुराच्या संकटामुळे राज्यासह लातूर जिल्हयातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र अद्याप चालू झाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. शासनाने जाहीर केलेल्या हमीभावाप्रमाणे सोयाबीन खरेदी होणे गरजेचे आहे असे आ. कराड यांनी पत्रात नमूद केले आहे.

शासनाने जाहीर केलेल्या हमीभावाप्रमाणे सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात यावेत अशी शेतकऱ्यांतून मागणी होत आहे. तेव्हा नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लवकरात लवकर लातूर जिल्हयात सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र सुरू करावेत अशी मागणी लातूर ग्रामीणचे आमदार श्री. रमेशआप्पा कराड यांनी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande