नेरळ ग्रामपंचायत हद्दीत कचऱ्याचे साम्राज्य!
रायगड, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून कचऱ्याचा प्रश्न चांगलाच डोकेदुखीचा ठरत आहे. निर्माण निर्माण नगरी, मुख्य रस्ते, बाजारपेठा, तसेच इतर वसाहती परिसरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले असून, त्या
नेरळ ग्रामपंचायत हद्दीत कचऱ्याचे साम्राज्य!


रायगड, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून कचऱ्याचा प्रश्न चांगलाच डोकेदुखीचा ठरत आहे. निर्माण निर्माण नगरी, मुख्य रस्ते, बाजारपेठा, तसेच इतर वसाहती परिसरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले असून, त्यातून दुर्गंधी पसरत आहे. ग्रामपंचायतीत सध्या प्रशासक नियुक्त असतानाही नियमितपणे कचरा उचलण्याचे काम होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

दररोज सकाळी व सायंकाळी गावातून जाणाऱ्या प्रवाशांना, व्यापाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी उघड्यावर कचरा टाकल्याने भटक्या कुत्र्यांचे टोळके फिरत आहेत, तर पावसामुळे साचलेला कचरा कुजून आजारपणाचे प्रमाण वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. आरोग्य विभागाकडून वेळोवेळी स्वच्छतेचे आदेश देण्यात येत असले तरी त्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे चित्र आहे.ग्रामपंचायतीत प्रशासक नेमण्यात आल्यापासून स्वच्छता कर्मचाऱ्यांची कामगिरी ढासळली आहे. पूर्वी देखील हीच परीस्थिती होती ओला आणि सुका कचरा आता आठवडे तसेच पडून राहत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. “कचरा संकलनासाठी ग्रामपंचायतीने घेतलेले कर भरत असूनही सेवा मिळत नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे,”

नेरळ ग्रामपंचायत परिसरात स्वच्छता अभियानाचे फलक लावलेले असले तरी प्रत्यक्षात कचरा व्यवस्थापनाची परिस्थिती चिंताजनक आहे. नागरिकांनी आता शासन प्रशासन आणि पंचायत विभागाकडे तक्रारी दाखल करण्याचा इशारा दिला आहे. “प्रशासक असूनही जर अशी दुर्दशा असेल तर सर्व सामान्य नागरिकांनी काय करावे असा प्रश्न नागरिक करत आहे.नेरळ गावाला पुन्हा ‘स्वच्छ आणि सुंदर’ बनवण्यासाठी तात्काळ कचरा उचल मोहिम राबवून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande