पुण्यातही धावणार आता हायड्रोजन बस
पुणे, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय हरित हायड्रोजन मोहिमे’अंतर्गत हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या वाहनांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. लेह, दिल्ली, बडोदा, हैदराबाद यासांरख्या शहरांनंतर पुणे शहराला यात प्राधान्य देण्यात आले आहे.
हायड्रोजन बस


पुणे, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। केंद्र सरकारने ‘राष्ट्रीय हरित हायड्रोजन मोहिमे’अंतर्गत हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या वाहनांना प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. लेह, दिल्ली, बडोदा, हैदराबाद यासांरख्या शहरांनंतर पुणे शहराला यात प्राधान्य देण्यात आले आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) हायड्रोजन बसची चाचणीही नुकतीच सुरू झाली.

या मोहिमेने नेमके काय साध्य होणार? हायड्रोजन बस ही एक प्रकारची इलेक्ट्रिक बस आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या रासायनिक अभिक्रियेद्वारे तयार होणारी वीज यात वापरली जाते. या प्रक्रियेत फक्त पाणी आणि उष्णता उत्सर्जित होत असल्याने प्रदूषण शून्य टक्के आहे. पारंपरिक डिझेल किंवा सीएनजी बसच्या तुलनेत ही बस पर्यावरणस्नेही आहे. बसच्या छतावर हायड्रोजन टाक्या आहेत. साधारण ७० किलो हायड्रोजनमध्ये सुमारे ३०० किलोमीटर अंतर ही बस पार करते. भारतात स्वदेशी बनावटीची पहिली हायड्रोजन बस २०२२ मध्ये पुण्यातच तयार करण्यात आली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande