
लातूर, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।
जागृती शुगरच्या १४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ व माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या अमृत महोत्सवी निमित्ताने २८ ऑक्टोंबर रोजी तळेगाव येथे सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे
राज्यातील खाजगी साखर कारखानदारीत उस उत्पादक शेतकऱ्यांना एफ आर पी पेक्षा अधिक भाव देणाऱ्या मांजरा साखर परिवारातील सदस्य असलेल्या देवणी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या १४ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी तथा जागृती शुगर चे संस्थापक अध्यक्ष दिलीपरावजी देशमुख यांच्या शुभ हस्ते राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील व अन्य मान्यवरांच्या हस्ते २८ ऑक्टोंबर रोजी मंगळवारी सकाळी १० वाजता शुभारंभ करण्यात येणार आहे
वेळी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी तथा कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांचा जागृती शुगर कारखान्याच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे
या कार्यक्रमाला उस उत्पादक, शेतकरी, सभासद, हितचिंतक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जागृती शुगरच्या अध्यक्षा सौ गौरवीताई अतुलजी भोसले,उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे,सन्माननीय संचालक मंडळ सरव्यवस्थापक गणेश येवले यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis