लातूर : बुधोडा येथे ट्रॅव्हल्स-सायकलचा अपघात; एकाचा मृत्यू
लातूर, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधोडा गावाजवळ एक अत्यंत दुःखद घटना घडली. येथे ट्रॅव्हल्स आणि सायकल पकल यांच्या झालेल्या भीषण धडकेत, सायकलस्वार महारुद्र ताडमाडगे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. 47 वर्षीय महारुद्र ताडम
अपघात


लातूर, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधोडा गावाजवळ एक अत्यंत दुःखद घटना घडली.

येथे ट्रॅव्हल्स आणि सायकल पकल यांच्या झालेल्या भीषण धडकेत, सायकलस्वार महारुद्र ताडमाडगे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. 47 वर्षीय महारुद्र ताडमाडगे हे मूळचे बामणी (जि. लातूर) येथील रहिवासी असून ते लातूरच्या बोधनगरमध्ये राहत होते आणि शहरातील एमआयटी दवाखान्यात काम करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, महारुद्र ताडमाडगे हे दररोजप्रमाणे सायकलवरून लातूरकडे जात असताना, बुधोडा येथील सर्विस रोडवर हा अपघात झाला. औसाकडून लातूरकडे जाणाऱ्या NL 01 B 2004 या ट्रॅव्हल्सने सायकलस्वाराला धडक दिली. ट्रॅव्हल्स चालकाने वाचवण्याचा प्रयत्न आहे. केला, मात्र सायकलस्वार दुर्दैवाने ट्रॅव्हल्सच्या मागच्या टायरखाली आले.

घटनेची माहिती मिळताच औसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स आणि सायकल औसा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत. या अपघातामुळे ताडमाडगे कुटुंबीयांवर मोठा आघात झाला असून त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. औसा पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande