महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र रणजी सामन्याआधी नाशिक मनपा आयुक्तांची मैदानात पाहणी
नाशिक, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। - नाशिक मध्ये १ ते ४ नोव्हेंबर दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआय - तर्फे महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र हा चार दिवसीय रणजी ट्रॉफी सामना हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब नाशिक येथे होत आहे. या निमि
महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र रणजी सामना म.न .पा .आयुक्त मनिषा खत्री यांची मैदानास भेट व पाहणी


नाशिक, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।

- नाशिक मध्ये १ ते ४ नोव्हेंबर दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ - बीसीसीआय - तर्फे महाराष्ट्र विरुद्ध सौराष्ट्र हा चार दिवसीय रणजी ट्रॉफी सामना हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लब नाशिक येथे होत आहे.

या निमित्ताने नाशिक म न पा आयुक्त व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षा मनिषा खत्री यांनी मैदानास खास प्रत्यक्ष भेट देऊन या सामन्याच्या तयारीचा आढावा घेतला. या प्रसंगी माननीय आयुक्तांनी सामन्याची खेळपट्टी, पॅव्हेलियन हॉल, दोन्ही संघांच्या ड्रेसिंग रूम्स व मैदानातील इतर सोयी सुविधांची पाहणी करून समाधान व्यक्त केले आणि रणजी ट्रॉफी सामन्यासाठी नाशिक म न पा चे संपूर्ण सहकार्य मिळेल याची ग्वाही दिली.आयाप्रसंगी त्यांनी बीसीसीआयचे खेळपट्टी तज्ञ - क्यूरेटर - टी मोहनन यांची देखील विचारपूस केली. आयुक्तांसमवेत नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन धनपाल ( विनोद ) शहा, सेक्रेटरी समीर रकटे , खजिनदार हेमंत देशपांडे, संघटनेचे कार्यकारिणी सदस्य व इतर पदाधिकारी डॉ अनिरुद्ध भांडारकर, हेतल पटेल, प्रवीण घुले, राजू आहेर, फय्याज गंजीफ्रॉक वाला ,शेखर घोष, रतन कुयटे , निखिल टिपरी आदि उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande