लातूरकरांना रेल्वेची भेट; मंगळवारी नांदेड-हडपसर विशेष गाडी धावणार
लातूर, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।रेल्वे प्रशासनाने नांदेड ते हडपसर दरम्यान विशेष गाडी मंगळवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वेला लातूर शहरातील लातूर स्टेशन आणि चाकूर तालुक्यातील लातूर रोड स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. परिणा
लातूरकरांना रेल्वेची भेट; मंगळवारी नांदेड-हडपसर विशेष गाडी धावणार


लातूर, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।रेल्वे प्रशासनाने नांदेड ते हडपसर दरम्यान विशेष गाडी मंगळवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वेला लातूर शहरातील लातूर स्टेशन आणि चाकूर तालुक्यातील लातूर रोड स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. परिणामी दिवाळी सुट्टीनिमित्ताने नांदेड आणि पुणे येथील लातूरकरांना प्रवासाची सुविधा झाली आहे.

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने कळविले आहे की, गाडी क्रमांक ०७६०७ ही साप्ताहिक विशेष गाडी मंगळवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ८:३० वाजता नांदेडहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ९:४० वाजता हडपसरला पोहचेल. तर गाडी क्रमांक ०७६०८ ही साप्ताहिक विशेष गाडी २८ ऑक्टोबर रोजी रात्री १०:४० वाजता हडपसरहून सुटतील आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२:१५ वाजता नांदेडला पोहचेल. या गाडीला १ फर्स्ट एसी, २ एसी-टू- टियर, ६ एसी-थ्री- टियर, १ एसी हॉट बुफे कार, ६ स्लीपर क्लास, ४ जनरल सेकंड क्लास आणि २लगेज कम ब्रेक व्हॅन असे २२ कोच असणार आहेत. या गाडीला पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर, लातूर रोड, धाराशिव, बार्शी टाउन, कुर्दुवाडी आणि दौंड येथे थांबे असणार आहेत. दरम्यान, दिवाळीच्या निमित्ताने लातूरला आलेल्या आणि लातूरहुन जाणाऱ्या प्रवाशांना या विशेष रेल्वे गाडीचा लाभ होणार आहे. सदरील गाडीसाठी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर विशेष शुल्कावर विशेष गाड्यांचे आरक्षण सुरू आहे असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande