
पुणे, 27 ऑक्टोबर (हिं.स.) : पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य रस्ते आणि नदीवरील पुलांचे आयुष्यमान किती झाले आहे. ते पूल धोकादायक आहेत का, त्याची बांधकाम तपासणी महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील सर्व पुलांचे संरचनात्मक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्यात येणार असून, सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे.पिंपरी-चिंचवड शहरातील भाग एकमेकांना जोडण्यासाठी तसेच, वाहतूक रहदारी सुरक्षित व्हावी म्हणून महापालिकेने मुख्य रस्त्यावर उड्डाणपूल आणि पवना, इंद्रायणी व मुळा नदी पात्रावर पूल उभारले आहेत. शहरातील विविध ४६ ठिकाणी पूल आणि उड्डाणपूल उभारले आहेत. त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पूल धोकादायक झाले आहेत का, वाहतुकीसाठी योग्य आहेत का, हे तपासण्यासाठी महापालिका मुख्य रस्त्यांवरील उड्डाणपूल आणि नदीवरील पुलांचे संरचनात्मक लेखापरीक्षण करणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु