बॅडमिंटन स्पर्धेत परभणीच्या यश मोरेचे दुहेरी यश
परभणी, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। अहिल्यानगर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये परभणी येथील उत्कृष्ट खेळाडू यश बाळासाहेब मोरे याने उल्लेखणीय कामगिरी करत वयोगट 15 वर्षाखालील एकेरी व मिश्र दुहेरी ह्या दोन्ही गटात अंतिम फे
बॅडमिंटन स्पर्धेत परभणीच्या यश मोरेचे दुहेरी यश


परभणी, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। अहिल्यानगर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये परभणी येथील उत्कृष्ट खेळाडू यश बाळासाहेब मोरे याने उल्लेखणीय कामगिरी करत वयोगट 15 वर्षाखालील एकेरी व मिश्र दुहेरी ह्या दोन्ही गटात अंतिम फेरीत धडक मारुन उपविजेते पद पटकावले.

या यशाबद्दल परभणी जिल्हा शटल बॅडमिंटन संघटनेच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष विजयराव जामकर, उपाध्यक्ष सचिन अंबिलवादे, सचिव रविंद्र पतंगे, सह-सचिव आशिष शहा यांच्यासह इतर पदाधिकारी सदस्य विनोद जेठवाणी, पांडुरंग कोकड, योगेश बरदाळे, मुन्ना गाडगे, उमेश काळे, मंगेश काळे, दिलीप शास्त्री, गजानन इसादकर, संजय गजमल, ग्यानोजी खराटे, राठोड यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांनी मोरे यास पुढील वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या. दरम्यान, मोरे यास राष्ट्रीय प्रशिक्षक रुतुपर्ण कुलकर्णी (छ. संभाजीनगर,) जिल्हा प्रशिक्षक उन्मेश गाडेकर व विकास जोशी यांचे प्रशिक्षण लाभले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande