सोलापूर - प्रिसिजन कॅमशॉफ्टने  एमआयडीसीत 45 एकर जागेवर नवीन प्रकल्प सुरू
सोलापूर, 27 ऑक्टोबर (हिं.स.)प्रिसिजन कॅमशॉफ्टने चिंचोळी एमआयडीसीत 45 एकर जागेवर नवीन प्रकल्प सुरू केला आहे. त्याचेे विस्तारीकरण करण्यात येत असून त्यामुळे 250 नवे रोजगार उपलब्ध होणार आहेत. येत्या जून 2026 पर्यंत प्रकल्प कार्यन्वित होईल. हा प्रकल्प आ
सोलापूर - प्रिसिजन कॅमशॉफ्टने  एमआयडीसीत 45 एकर जागेवर नवीन प्रकल्प सुरू


सोलापूर, 27 ऑक्टोबर (हिं.स.)प्रिसिजन कॅमशॉफ्टने चिंचोळी एमआयडीसीत 45 एकर जागेवर नवीन प्रकल्प सुरू केला आहे. त्याचेे विस्तारीकरण करण्यात येत असून त्यामुळे 250 नवे रोजगार उपलब्ध होणार आहेत. येत्या जून 2026 पर्यंत प्रकल्प कार्यन्वित होईल. हा प्रकल्प आपल्याच देशात सुरू व्हावा यासाठी विदेशातूनच काय पूर्ण भारतातील काही मोठ्या सेंटर्सवरून आमच्यावर दबावही होता. मात्र, आम्ही त्या सर्वांना न जुमानता सोलापुरातच प्रकल्प उभा करण्याचा निश्चय केला, तो पूर्णत्वास नेला, अशी माहिती प्रिसिजन उद्योग समुहाचे चेअरमन यतीन शहा यांनी दिली.

चिंचोळी एमआयडीसीत प्रिसिजनचे कॅमशॉफ्ट उत्पादनाचे युनिट आहे. त्याच्या बाजूला 45 एकर जागेवर या कॅमशॉफ्ट उत्पादनाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी नवा प्रकल्प उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. यामध्ये कॅमशॉफ्ट सह इलेक्ट्रिक व्हेईकलचा प्रकल्पही उभारण्यात येणार आहे. कॅमशॉफ्ट बनविण्यासाठी जगातील सर्वोत्कृष्ट टेक्नॉलॉजी वापरण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande