नाशिक शहरातील 'रामकालपथ' झळकणार नव्या रंगात
नाशिक, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। - आगामी सिंहस्थ महापर्वाच्या तयारीसाठी पंचवटी परिसरातील ''रामकालपथ'' प्रकल्पाला गती मिळाली आहे. रामकुंड, काळाराम मंदिर, सीतागुंफा आणि गोदाकाठ या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या या मार्गावर रंगरंगोटी, स्वच्छता व भित्तिचित
नाशिक शहरातील 'रामकालपथ' झळकणार नव्या रंगात


नाशिक, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।

- आगामी सिंहस्थ महापर्वाच्या तयारीसाठी पंचवटी परिसरातील 'रामकालपथ' प्रकल्पाला गती मिळाली आहे. रामकुंड, काळाराम मंदिर, सीतागुंफा आणि गोदाकाठ या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या या मार्गावर रंगरंगोटी, स्वच्छता व भित्तिचित्रांच्या कामांना प्रारंभझाला आहे. भगवा आणि पिवळ्या छटांमध्ये सजणाऱ्या मंदिरांच्या भिंतींवर रामायणातील प्रसंगांचे आकर्षक चित्रण केले जात असून, परिसर नव्या रूपात उजळत आहे.

या प्रकल्पासाठी केंद्र, राज्य सरकार आणि ही नाशिक महानगरपालिका मिळून १४६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पहिला टप्पा २०२६ अखेर पूर्ण होणार असून, त्यासाठी सध्या २२ कोटी रुपयांचा प्रारंभिक निधी खर्च केला जात आहे. अहिल्यादेवी होळकर पूल ते टाळकुटेश्वर पूल या मार्गावर सुशोभीकरण, दगडी फरशा, शिल्पकला, विद्युत रोषणाई आणि भित्तिचित्रे तयार केली जात आहेत. सीतागुंफा ते काळाराम मंदिर, गांधी तलाव, रामतीर्थ परिसरात अतिक्रमण हटवून आकर्षक भिंत बांधण्याची योजना असून, हा मार्ग लवकरच नाशिकच्या धार्मिक सौंदर्याचे नवे प्रतीक ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande