
छत्रपती संभाजीनगर, 27 ऑक्टोबर (हिं.स.) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, छत्रपती संभाजीनगर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक अनुषंगाने कार्यकर्ता जनसंवाद मेळावा संपन्न झाला. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित राहून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांच्या विचारांना प्राधान्य देणारा पक्ष आहे. पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या हिताच्या योजना राबवल्या जातात. आपल्या पक्षाचे काम जनतेपर्यंत पोहोचवा. प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकांच्या दृष्टीने जोमाने कामाला लागून पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्नशील असावे, असे आवाहन यानिमित्ताने केले. आमदार सतीशराव चव्हाण, शिक्षक आमदार विक्रमबप्पा काळे, शहराध्यक्ष अभिजीत देशमुख, माजी सभापती ठुगणराव भागवत, गफार कादरी, माजी आमदार नितीन पाटील, युवक जिल्हाध्यक्ष अनुराग शिंदे, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव बनकर, कल्याण राठोड, प्रदेश सरचिटणीस एकनाथ गवळी, मयूर सोनवणे, सर्व फ्रंटल सेलचे पदाधिकारी, महिला, युवक, विद्यार्थी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis