छ.संभाजीनगर - रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याचा दहावा गळीत हंगाम शुभारंभ
छत्रपती संभाजीनगर, 27 ऑक्टोबर (हिं.स.) चौंढाळा ता.पैठण येथील श्री रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना लि. दहावा गळीत हंगाम शुभारंभ व मोळीपूजन शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले.सहकारातून समृद्धीकडे हा प्रवास म्हणजे शेतकऱ्यांच्या
रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना लि. दहावा गळीत हंगाम शुभारंभ


छत्रपती संभाजीनगर, 27 ऑक्टोबर (हिं.स.) चौंढाळा ता.पैठण येथील श्री रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखाना लि. दहावा गळीत हंगाम शुभारंभ व मोळीपूजन शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले.सहकारातून समृद्धीकडे हा प्रवास म्हणजे शेतकऱ्यांच्या घामातून निर्माण झालेला गोडवा आणि ग्रामीण भागाच्या प्रगतीचा पाया आहे असे खासदार भुमरे म्हणाले.

या कारखान्याच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार,आर्थिक स्थैर्य आणि नव्या संधींचे दरवाजे उघडले आहेत.तसेच, पर्यावरणपूरक आणि तंत्रज्ञानाधारित उपक्रमांमुळे कारखाना अधिक सक्षम आणि शाश्वत बनला आहे. याचाही उल्लेख खासदारांनी केला.या दहाव्या गळीत हंगामासाठी सर्व शेतकरी बांधव,

कामगार, संचालक मंडळ व कारखाना परिवारास हार्दिक शुभेच्छा! देताना ते म्हणाले, हा हंगाम सर्वांसाठी गोडवा, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande