
परभणी, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। निवासी मैत्री प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागातील पशुच्या कृत्रिम रेतनामध्ये वाढ होवुन आर्थिक पाठबळ मिळेल, असे मत पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुधीर राजुरकर यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय गोकुळ मिशन या प्रकलपा अंतर्गत महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, नागपुर आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात बहुउद्देशीय कृत्रीम रेतन तंत्रज्ञ अर्थात मैत्री संकल्पना राबविण्यासाठी डॉ. सचिन बोंडे, विस्तार शिक्षण संचालक मपमविवि, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयात एक महिन्याच्या निवासी मैत्री प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन डॉ. राजुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या प्रशिक्षणासाठी महाविद्यालयाकडून सर्व प्रकारच्या बाबीची पुर्तता केली जाईल, असे राजूरकर यांनी म्हटले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. धनंजय देशमुख तर व्यासपीठावर या कार्यक्रमाचे प्रशिक्षण सह समन्वयक डॉ. एम. एफ. सिद्दीकी, डॉ. शरद चेपटे, डॉ. प्रभाकर घोरपडे, डॉ. पानगावकर, डॉ. नांदेडकर यांची उपस्थीती होती. या प्रशिक्षणासाठी एकुण 30 सुशीक्षीत बेरोजगार तरुणाची निवड पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे प्रास्तावीक प्रशिक्षण समन्वयक डॉ. प्राणेश येवतीकर यांनी केले. प्रकल्प समन्वयक डॉ. आभिनय सावळे यांनी प्रशिक्षणाबाबत सविस्तर माहीती दिली. हा कार्यक्रम तसेच प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी सर्व प्रशिक्षण सह समन्ययकांनी मोलाचे योगदान दिले. हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी पशुऔषधशास्त्र विभागाच्या आचार्य व पदव्यव्यू त्तर विद्यार्थी डॉ सलाओद्दीन आदी परिश्रम घेत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis