
परभणी, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाथरी शहराच्या विकासासाठी अनेक विकास कामांना मंजूरी दिली आहे,व काही पुर्ण ही झाले आहेत. यापुढेही निधी मिळेल असा विश्वास शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी सांगितले
प्रभाग क्र.२ गौतम नगर येथे पाथरी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण प्रचार संवाद बैठक पार पडली.
यावेळी खान बोलत होते
या बैठकीत गौतम नगर, हनुमान नगर,आदर्श नगर, जायकवाड़ी वसाहत, इंदिरा नगर येथील नगरपरिषद निवडणुकांबाबत नागरिकांशी व कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद व शिवसेना कार्यालयाचे उद्दघाटन झाले.
या बैठकीतून आगामी नगरपरिषद निवडणुकांसाठी शिवसेना पक्ष पूर्णपणे सज्ज असून,नागरिकांमधील उत्साह आणि आत्मविश्वास पाहता पक्ष विजयी होईल, असा ठाम विश्वास महिला व नागरिकांकडून व्यक्त करण्यात केला.
पाथरी येथे मागासवर्गीय मुलांचे व मुलींचे वसतिगृह इमारत बांधकाम मंजूरी मिळाली
पाथरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सुशोभिकरण करणे.
सन 2023-24 वर्षांमधील रमाई घरकुल मंजूर (घरकुल लाभारर्थी संख्या - 165)
सन 2024-25 वर्षातील DPDC योजने अंतर्गत पाथरी शहरातील प्रभाग क्र २
मध्ये सर्व ठिकाणी लाईट पोल बसविण्यात आले.
सन 2024-25 वर्षार्तील DPDC योजने अंतर्गत पाथरी शहरातील प्रभाग क्र२ मधील हनुमान नगर, गौतम नगर, इंदिरानगर, भिम नगर, जायकवाडी बसाहत येथे सी. सी. रोड व नाली बांधकाम केले.
प्रभाग क्र 7 मधील आण्णाभाऊ साठे समाज मंदिर ते आठवडी बाजार पर्यंत सी. सी, रोड व नाली बांधकाम केले.
असे अनेक विकास कामे आपण केली व पुढील काळात सुरुच ठेऊ असा विश्वास त्यांनी दिला. यावेळी लाडक्या बहिणी, नागरिक, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते..!
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis