बीड : सुंदर नगर साखर कारखान्याच्या गळीत हंगामाला मंगळवारपासून सुरुवात
बीड, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना सुंदरनगर सन २०२५ - २६ या ३४ व्या गळीत हंगाम शुभारंभाच्या निमित्ताने गव्हाण पूजनाचा कार्यक्रम ह.भ.प.गुरुवर्य महंत.शिवाजी महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. दिनांक 28 ऑक्
गव्हाण पूजनाचा कार्यक्रम


बीड, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना सुंदरनगर सन २०२५ - २६ या ३४ व्या गळीत हंगाम शुभारंभाच्या निमित्ताने गव्हाण पूजनाचा कार्यक्रम ह.भ.प.गुरुवर्य महंत.शिवाजी महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

दिनांक 28 ऑक्टोबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे.माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी या संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की माजलगाव तालुक्यातील लोकनेते सुंदररावजी सोळंके साखर कारखाना शेतकऱ्यांच्या पाठिंबा आणि सहकार्याने यशस्वी वाटचाल करतो आहे. यंदाच्या वर्षी माजलगाव तालुक्यात उसाचे प्रमाण देखील अधिक आहे त्यामुळे अधिकाधिक गाळप होईल असे त्यांनी सांगितले.

कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद,बिगर सभासद, ऊस उत्पादक शेतकरी व सर्व हितचिंतकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आमदार प्रकाश सोळंके यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande