संपदा मुंडे आत्महत्येस जबाबदार आरोपींविरुध्द कठोर कारवाईची परभणीकरांची मागणी
परभणी, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील वडवनी येथील सामान्य कुटूंबातील व नीट सारख्या परिक्षेत टॉपर असणार्‍या अतिशय जिद्दीने व खडतर प्रवास करीत एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केलेल्या डॉ. संपदा मुंडे या तरुण डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात सर्व आरोपींव
संपदा मुंडे यांच्या आत्महत्येस जबाबदार असणार्‍या आरोपींविरुध्द कठोर कारवाई करा : परभणीतून मुख्यमंत्र्यांना निवेदन


परभणी, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।

बीड जिल्ह्यातील वडवनी येथील सामान्य कुटूंबातील व नीट सारख्या परिक्षेत टॉपर असणार्‍या अतिशय जिद्दीने व खडतर प्रवास करीत एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केलेल्या डॉ. संपदा मुंडे या तरुण डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात सर्व आरोपींविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी परभणीतील संतप्त नागरीकांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली.

भाई किर्तीकुमार बुरांडे, प्रा. तुकाराम साठे, अ‍ॅड. पवन जोंधळे, बालाजी मोहिते, सुधीर साळवे, प्रा. राजेश रणखांबे, अमोल लांडगे, अ‍ॅड. मोती शिंदे आदींनी जिल्हाधिकार्‍यांमार्फत सादर केलेल्या या निवेदनात, प्रशासनातील व राजकारणातील गीधाडांनी डॉ. संपदा मुंडे हीचे उज्ज्वल आयुष्य संपवायला भाग पाडलं. जरी त्या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली असली तरी आणखी बरेच आरोपी मोकाट फिरत आहेत. त्यामुळे या प्रकरणात अतिशय गांभीर्यपूर्वक चौकशी करुन प्रशासनातील असो अथवा राजकारणातील असो सर्व आरोपींना कायदेशीर कडक शिक्षा द्यावी व भविष्यात अशी घटना पुढे घडणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande