
जळगाव, 27 ऑक्टोबर (हिं.स.) जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील विटनेर गावात राहणाऱ्या ३४ वर्षीय शेतकरी शिवदास रामा पाटील यांनी शनिवारी (२६ ऑक्टोबर) स्वतःचे जीवन संपवले. घरात एकटे असताना त्यांनी गळफास घेतला असून, तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून, कुटुंबीय आणि शेजाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, शिवदास पाटील हे आई आणि पत्नीसह विटनेर येथे राहून शेती करून उदरनिर्वाह मिळवत होते. दिवाळीच्या तयारीसाठी त्यांची पत्नी माहेरी गेली होती, तर वीज खंडित झाल्याने आई घराबाहेर बसली होती. घरात पूर्ण अंधार असताना शिवदास यांनी हा टोकाचा निर्णय घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर