शिवानी सूर्यवंशी “मिस लातूर 2025” ने सन्मानित
लातूर, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूरची कन्या कु. शिवानी रामभाऊ सूर्यवंशी यांनी “मिस लातूर 2025” हा मानाचा किताब पटकावत लातूरचे नाव उज्ज्वल केले आहे. लातूरकरांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे. शिवानी सूर्यवंशी यांनी देवघर येथे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या
लातूरकरांसाठी हा अभिमानाचा क्षण-डाॅ.अर्चना पाटील चाकूरकर


लातूर, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। लातूरची कन्या कु. शिवानी रामभाऊ सूर्यवंशी यांनी “मिस लातूर 2025” हा मानाचा किताब पटकावत लातूरचे नाव उज्ज्वल केले आहे. लातूरकरांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे.

शिवानी सूर्यवंशी यांनी देवघर येथे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांची भेट घेतली त्यावेळी डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांनी शिवानी चे कौतुक करताना लातूर साठी फार आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक क्षेत्रात लातूर विकसित होत असताना मिस लातूर 2025 हा मानाचा तुर्रा लातूरच्या कन्येच्या शिरपेचा रोवला गेला.

सध्या शिवानी या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर येथे एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहेत, तसेच त्या भरतनाट्यम मध्ये सुद्धा विषारद असून, वैद्यकीय शिक्षणासोबतच त्यांनी आपल्या कला, परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर ३५० पेक्षा अधिक राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार त्यांनी पटकावले आहेत. देवघर येथील निवासस्थानी सत्कार करून, त्यांच्या पुढील वाटचालीस व उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांनी दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande