परभणी शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद
परभणी, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। येलदरी धरण येथून परभणी शहराला होणाऱ्या पाणीपुरवठा पाईपलाईनला जिंतूर परिसरात गळती झाल्याने परभणी शहरातील पाणीपुरवठा दि. 28 व 29 ऑक्टोबर रोजी बंद राहणार आहे, अशी माहिती परभणी महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे. गळती दु
परभणी शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद


परभणी, 27 ऑक्टोबर (हिं.स.)। येलदरी धरण येथून परभणी शहराला होणाऱ्या पाणीपुरवठा पाईपलाईनला जिंतूर परिसरात गळती झाल्याने परभणी शहरातील पाणीपुरवठा दि. 28 व 29 ऑक्टोबर रोजी बंद राहणार आहे, अशी माहिती परभणी महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.

गळती दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, काम पूर्ण होताच शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनाने सांगितले. महानगरपालिकेने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा सावध आणि जपून वापर करण्याचे आवाहन केले असून, दुरुस्तीची प्रगती व पाणीपुरवठ्याची स्थिती याबाबत वेळोवेळी माहिती देण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande