
अमरावती, 27 ऑक्टोबर (हिं.स.)।
दिवाळी हा उत्साहाचा सण... नात्यात गोडवा निर्माण करणारा नाते घट्ट करण्याचा सण... एकमेकांना शुभेच्छा देण्याचा सण... एकमेकांच्या शुभचिंतनाचा त्यौहार... पण, या आनंदमयी उत्साहात... एक मिठाचा खडा पडला, अन् कटुता निर्माण झाली. माजी मंत्री यशोमती ठाकुर यांना दिवाळीचा किराणा पाठवून स्वस्त प्रसिद्धीचा शो करण्याचा प्रयत्न केल्याने वातावरण तापलंय. त्याला यशोमतींनी फस्ट वॉर्निंग... देत उत्तर दिलयं... तुम्हाला जर खरंच समाजासाठी काही करायचं असेल, तर किराणा पाठवण्याचा दिखावा न करता शेतकऱ्यांना मदत करा! अशा शब्दात उत्तर देत माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकुर यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
शेतकरी आत्महत्या करत आहेत, शेती कोरडी पडली आहे आणि लोक संकटात आहेत. अशावेळी आम्ही शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होऊन काळी दिवाळी साजरी केली. तुम्हाला जर खरंच समाजासाठी काही करायचं असेल, तर किराणा पाठवण्याचा दिखावा न करता शेतकऱ्यांना मदत करा !
आणि जर पुन्हा असा कुचेष्टापूर्ण प्रकार करण्याची हिंमत दाखवली, तर त्याचं सडेतोड उत्तर दिलं जाईल.हे जे चित्र विचित्र लोक आहेत, कधी नवरा कुठे तर कधी बायको कुठे... कधी सत्ते मध्ये ,कधी आमच्या सपोर्टने तर कधी कुणाच्या सपोर्टने काय - काय राजकारण करत असतात. त्यांनी हा... सोयाबीन, बिस्कीट, शाळेत वाटपहोणारे साहित्य, तेल, साखर, शेंगदाने, बेसण, डाळ... किराणा पाठविला..... परत जर असं केलं ना... चांगल उत्तर देणार... माझ्या बापजाद्यांनी कधी बारदाना चोरला नाही. मी प्रतिष्ठित घराण्यातील मुलगी आहे आणि प्रतिष्ठित व्यक्तीची बायको आहे. मी असे तुमच्या सारखे चिल्लर धंदे करीत नाही... जर तुम्ही जर असे चिल्लर धंदे करीत असाल तर त्याचं उत्तर आम्हाला देता येतं. शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेली आहे. अरे.......तुम्हाला जर या प्रकारे आमचा अपमान करायचा असेल, त्याला काय अर्थउरतो काय ? तुम्हा जे काही किराणा द्यायचा असेल, शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे आहेत, ते द्यानं तुम्ही... या काय लावल्या भानगडी...ये भैय्या आणि भाभी... अवकातीत राहायचंय....मी पडली, निवडून आली, मंत्री झाली... माझ्या स्वभावात काही फरक पडत नाही. मी सरड्या सारखा रंगही बदलत नाही. तुमच्या अवकातीत राहा... पुन्हा एकदा सांगते. परत अशी भानगड केली तर असं उत्तर देईन की, याद राखानं.. असा इशारा यावेळी यशोमती ठाकुर यांनी दिला. ठाकुर पुढे म्हणाल्या की, जनतेच्या भावनांचा अपमान करून राजकारण करणाऱ्यांना अमरावतीकरं कधीच माफ करणार नाहीत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी