दिलीप मानेंच्या प्रवेशाला तूर्तास ब्रेक'; राजन पाटील, यशवंत माने, शिंदेंचं ठरलं; बुधवारी भाजप प्रवेश
सोलापूर, 27 ऑक्टोबर (हिं.स.) : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा असलेले ऑपरेशन लोटसमधील महत्त्वाचा टप्पा बुधवारी पूर्ण होणार आहे. यामध्ये सहकार परिषदेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित शिंदे या
दिलीप मानेंच्या प्रवेशाला तूर्तास ब्रेक'; राजन पाटील, यशवंत माने, शिंदेंचं ठरलं; बुधवारी भाजप प्रवेश


सोलापूर, 27 ऑक्टोबर (हिं.स.) : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा असलेले ऑपरेशन लोटसमधील महत्त्वाचा टप्पा बुधवारी पूर्ण होणार आहे. यामध्ये सहकार परिषदेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित शिंदे या तिघांचा मुंबईतील सकाळी अकरा वाजता भाजप पक्ष कार्यालयात प्रवेश होणार आहे. मात्र, स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे सोलापूर बाजार समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रवेशाला तूर्त ब्रेक लागला आहे.दुसरीकडे काँग्रेसचे दक्षिण सोलापूर मतदारसंघातील माजी आमदार दिलीप माने यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय झाल्यानंतर भाजपमध्ये अंतर्गत बंडखोरी झाली. माने यांना पक्षात प्रवेश देऊ नये यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र, पक्षाने कार्यकर्त्यांच्या विरोधाची दखल घेत माने यांचा प्रवेश पुढे ढकलला आहे. याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील आठवड्यात माने यांच्या प्रवेशावर निर्णय घेतला जाणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. दरम्यान, याबाबत दिलीप माने यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande