
लातूर, 28 ऑक्टोबर (हिं.स.)। भाजप आमदार अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. लातूरातील प्रस्तावित स्टॅच्यू ऑफ नॉलेजच्या 10 कोटींच्या मंजूर कामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली.
लातूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे विश्वरत्न, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 75 फुटाचा भव्य पुतळा उभारण्यासाठी 10 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला, पण त्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याची बाब श्री विनोद खटके यांच्या नेतृत्वाखालील व्हीएस पॅंथर्स युवा संघटनेने, शहरातील पदाधिकाऱ्यांनी, समाजातील विविध संघटनांनी व समाजबांधवांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर यासंदर्भात तात्काळ लातूरच्या जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना संपर्क साधून सदरील कामाला तात्काळ प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यासंदर्भात कार्यवाही करावी अशी विनंती केली होती.
याच विषयासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनाही विनंती केली होती. लातूरातील प्रस्तावित स्टॅच्यू ऑफ नॉलेजच्या 10 कोटींच्या मंजूर कामासाठी आज प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis