'साथी पोर्टल-2’च्या अंमलबजावणी विरोधात राज्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा एकदिवसीय बंद
अकोला, 28 ऑक्टोबर (हिं.स.)।राज्य शासनाच्या कृषी विभागाने बियाणे विक्रीसाठी ‘साथी पोर्टल-२’चा अनिवार्य वापर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या पोर्टलच्या वापरामुळे अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी केला आहे. त्
प


अकोला, 28 ऑक्टोबर (हिं.स.)।राज्य शासनाच्या कृषी विभागाने बियाणे विक्रीसाठी ‘साथी पोर्टल-२’चा अनिवार्य वापर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या पोर्टलच्या वापरामुळे अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी केला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेते संघटनांनी आज एकदिवसीय आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन विक्री बंद आंदोलन पुकारले आहे.देशातील 32 राज्यामध्ये ही ऍप सुरू करण्यात आली असून केवळ महाराष्ट्र सरकारनेच हे सक्तीचे केले असल्याचा आरोप विक्रेत्यांनी केलाय.प्रत्येक बियाण्याच्या पाकिटाचे लेवल नंबर वेगवेगळे असल्याने ही प्रक्रिया खूप किचकट होत असल्याचाही विक्रेत्यांनी म्हंटलंय. विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, ‘साथी पोर्टल-२’वरील प्रक्रिया गुंतागुंतीची असून व्यवहार करताना अनेक अडचणी येणे तसेच ग्राहकांना बियाणे विक्री करताना विलंब होणे अशा अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या पोर्टलच्या अंमलबजावणीस विरोध दर्शवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्यभरातील कृषी व्यवसायिकांनी एक दिवसाचा व्यापार बंद ठेवत आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande