
जळगाव, 28 ऑक्टोबर (हिं.स.) | मागच्या काही दिवसापासून जळगाव राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातले. यामुळे कापूस, सोयाबीन, मक्यासह इतर पिकांचे नुकसान मोठे झाले.
जळगाव जिल्ह्यात देखील आगामी चार दिवस हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे गेल्या चार दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी होत असलेल्या अवकाळी पावसाला शेतकरी आता अक्षरशः वैतागले आहेत. पाऊस आणखी किती दिवस छळणार कोण जाणे, असे उद्गार हताशेपोटी शेतकऱ्यांच्या तोंडी आहेत. २९ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान पुन्हा हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. उन्ह आणि ढगाळ असं मिश्र वातावरण राहणार असून, कमाल तापमानात पुन्हा थोडीशी घट होण्याचे संकेत आहेत.
दरम्यान बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होतेय.या चक्रवादळाला ‘मोंथा’ हे नाव सुचवलेल असून या मोंथा चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार असल्याचा अंदाज वर्तवलाय.यामुळे महाराष्ट्रात अजून काही दिवस पावसाचे ढग कायम राहणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर