परभणीत संतप्त शेतकऱ्याचा रोष : जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडली
परभणी, 28 ऑक्टोबर, (हिं.स.)। अतिवृष्टी आणि पिक नुकसानीची मदत मिळाली नाही, तसेच सरकारकडून शेतकरीविरोधी धोरण राबवले जात असल्याच्या निषेधार्थ परभणीत संतप्त शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडल्याची धक्कादायक घटना घडली. संतोष रावण पैके (रा.
परभणीत संतप्त शेतकऱ्याचा रोष : जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडली


परभणी, 28 ऑक्टोबर, (हिं.स.)। अतिवृष्टी आणि पिक नुकसानीची मदत मिळाली नाही, तसेच सरकारकडून शेतकरीविरोधी धोरण राबवले जात असल्याच्या निषेधार्थ परभणीत संतप्त शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडल्याची धक्कादायक घटना घडली.

संतोष रावण पैके (रा. चाटोरी, ता. पालम) असे या संतप्त शेतकऱ्याचे नाव आहे. परभणी जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत वारंवार झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि पुराच्या पाण्याने शेतात घुसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हजारो एकरांवरील पिके वाहून गेल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडले आहेत.

शासनाकडून नुकसानीची मदत अद्याप मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. दिवाळी सण काळातही अनेकांनी “काळी दिवाळी” साजरी केली. या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर संतोष पैके यांनी संतापाच्या भरात जिल्हाधिकाऱ्यांची अधिकृत गाडी फोडली. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत शेतकरी संतोष पैके यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने प्रशासनात एकच खळबळ उडाली असून, शेतकरी असंतोष किती तीव्र झाला आहे याची झलक या घटनेतून दिसून आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande