
छत्रपती संभाजीनगर, 28 ऑक्टोबर (हिं.स.) इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. पात्र विद्यार्थ्यांचे सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्याची प्रक्रिया ३० जून पासून सुरु झाली आहे. सर्व पात्र विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क, शिष्यवृत्ती, परीक्षा शुल्क योजनेचे आवेदनपत्र महाविद्यालयांनी भरुन सहायक संचालक इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभाग यांच्या कार्यालयात मंजूरीसाठी पाठवावयाचे आहेत. शिष्यवृत्ती अर्ज हे महाडीबीटी पोर्टलच्या लॉगईन मध्ये अल्प प्रमाणात भरण्यात आले आहेत. तरी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी स्वतः विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन लॉगीन करावे. एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी,असे सहाय्यक संचालक दयानंद कोकरे यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis