
बीड, 28 ऑक्टोबर (हिं.स.)डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शासन व्हावे व पिडीतेला न्याय मिळावा या मागणीसाठी बीड जिल्ह्यातील वडवणी येथे रास्ता रोको आणि मोठे आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे वडवणी बंदचे आवाहन देखील करण्यात आले होते.आज मंगळवारी वडवणी ते बीड या मुख्य रस्त्यावर हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात ग्रामस्थांसहित व्यापारी राजकीय नेते मोठ्या संख्येने सहभागी झाली होते फलटण येथील रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी फलटण येथे आत्महत्या केली होती त्याचे पडसाद बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उमटले. मूळ वडवणी तालुक्यातील असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी आरोपीवर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे. या रास्ता रोको आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक विस्कळीत झाली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis