
अमरावती, 28 ऑक्टोबर (हिं.स.) ‘ आदिवासी एकता मित्र मंडळ, स्व. लक्ष्मणराव मांनकर ट्रस्ट आणि प्रगती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंती वर्षानिमित्त ‘भगवान बिरसा कला संगम’ ही राज्यस्तरीय आदिवासी कला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेची पश्चिम विदर्भ विभागीय फेरी (डिव्हिजनल राउंड) मंगळवार, २८ ऑक्टोबर रोजी अमरावती येथे पार पडले. आहे. ही स्पर्धा सकाळी १० वाजता क्षितिज पॅलेस, राजपूत ढाबा जवळ, नवसारी चौक, अमरावती येथे झाली. या फेरीत पश्चिम विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, Washim (वाशीम) आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील सुमारे ४०० स्पर्धक सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील आदिवासी कलाकारांना संधी, सन्मान आणि राज्यस्तरीय ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेत नृत्य, गायन, वाद्यवादन, चित्रकला, हस्तकला, रील्स, व्लॉग्स, फोटोग्राफी, डॉक्युमेंटरी आणि शॉर्ट फिल्म अशा विविध कला प्रकारांमध्ये स्पर्धा घेतल्या गेल्यात. पूर्व विदर्भ क्षेत्रातील फेरी गडचिरोली येथे आयोजित केली जाणार असून, राज्यस्तरीय अंतिम फेरीचे आयोजन येत्या महिन्यात नागपूर येथे केले जाईल. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने आयोजित या अंतिम फेरीतील विजेत्यांना आकर्षक व सन्माननीय पारितोषिके प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती स्व. लक्ष्मणराव मानकर ट्रस्टचे सचिव प्रशांत बोपर्डीकर यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी