जालना : नागरिकांनी ई-कचरा संकलन अभियानात सहभाग नोंदवावा - जिल्हाधिकारी
जालना, 28 ऑक्टोबर, (हिं.स.)। जालना जिल्हाधिकारी कार्यालय व नॅचर इको बिल्डींग प्रायव्हेट लिमिटेड या केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ नोंदणीकृत संस्थेच्या सहकार्याने जिल्हास्तरीय ई-कचरा संकलन अभियान दि.28 ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत आयोजित करण्या
नागरिकांनी ई-कचरा संकलन अभियानात सहभाग नोंदवावा


जालना, 28 ऑक्टोबर, (हिं.स.)। जालना जिल्हाधिकारी कार्यालय व नॅचर इको बिल्डींग प्रायव्हेट लिमिटेड या केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ नोंदणीकृत संस्थेच्या सहकार्याने जिल्हास्तरीय ई-कचरा संकलन अभियान दि.28 ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्याकडे असलेला ई-कचरा जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात जमा करुन या अभियानात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

भारतामध्ये दरवर्षी 1.6 दशलक्ष टनापेक्षा अधिक ई-कचरा निर्माण होतो या कचऱ्यापैकी बऱ्याच कचऱ्याची विल्हेवाट ही अनाधिकृत मार्गाने केल्याने त्याचे गंभीर परिणाम पर्यावरणावर होताना दिसून येत आहेत. जिल्हातील नागरिकांना ई-कचऱ्याचा वैज्ञानिक व पर्यावरणपुरक निपटारा करण्यासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी दि.28 ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत भारत सरकारच्या खाण मंत्रालय व जवाहरलाल नेहरुन ॲल्युमिनीयम रिसर्च डेव्हलपमेंट ॲण्ड डिझाईन सेंटरच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छतोत्सव अभियानांतर्गत नेचर इको बिल्डींग प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयात ई-कचरा संकलन अभियान आयोजित करण्यात आले आहे. सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या विभागाच्या कार्यालयातील आपल्या अधिकारी व कर्मचारी यांच्या घरातील वापरात नसलेले संगणक, प्रिंटर, मॉनिटर, मोबाईल, बॅटरी, युपीएस, फॅक्स मशिन, स्कॅनर आदि ई-कचऱ्याचे वर्गीकरण करुन जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य सभागृहात संकलन करावे. ई-कचरा संकलन करतेवेळी मुल्य प्रति युनिट/किलो प्रमाणे दिले जाणार आहे. ई-कचरा संकलन अभियानाचा उद्देश कार्यालयामधून तसेच घरगुती स्तरावर निर्माण होणारा ई-कचरा सुरक्षित आणि पर्यावरणपुरक पध्दतीने संकलित करुन त्याचा योग्य निपटारा करणे हा आहे. ई-कचरा उघड्यावर फेकणे, जाळणे किंवा तोडफोड केल्याने त्यातील शिसे, पारा, कॅडमियम इत्यादी विषारी घटक माती, हवा आणि भुजलात मिसळून प्रदुषण निर्माण करतात व सार्वजनिक आरोग्यावर दुष्परिणाम करतात. नोंदणीकृत पुनर्वापरकर्त्याकडे ई-कचरा सुपूर्द केल्यास प्रदुषण रोखता येते तसचे पुनर्वापर योग्य धातू व घटक सुरक्षितरित्या पुर्नप्राप्त करता येतात, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande